Navneet Rana And Ravi Rana : खासदार नवनीत राणा , आमदार रवी राणा मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे राणा दांपत्य आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हट्टाने हनुमान चालीसा पठण करण्याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सलग दोन वेळा राणा दांपत्य कोर्टात गैरहजर राहिलं होतं. गेल्यावेळी कोर्टानं त्यांना फटकारल्यामुळे आजच्या सुनावणीला राणा दांपत्य हजर राहणार आहे.