Climate Change : जगातील तीन अब्जाहून अधिक लोकांना हवामान बदलाचा फटका सहन करावा लागणार : ABP Majha

Continues below advertisement

जगातील तीन अब्जाहून अधिक लोकांना हवामान बदलाचा फटका सहन करावा लागणार आहे.  हवामान बदलावर काम करणाऱ्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज अर्थात IPCCने प्रसिद्ध केलेल्या अहवालात इशारा दिलाय. कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास मानवाला गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल असा इशाराही या अहवालात देण्यात आलाय. तसंच कृषी उत्पन्न घटून पुराचा धोका वाढण्याची भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आलीय. तापमानवाढीमुळे आशियाई देशांमध्ये या शतकाच्या अखेरीस दुष्काळी परिस्थितीत पाच ते २० टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा इशाराही या अहवालात देण्यात आलाय. एवढेच नव्हे, तर तापमानात एक ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते. सामाजिक-आर्थिक बदलामुळे आशिया खंडातील सर्व देशांमध्ये पाणीपुरवठा आणि मागणी यात मोठा असमतोल निर्माण होऊ शकतो़.  त्यामुळे पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागू शकते असंही या अहवालात नमूद केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram