COVID-19 | Maharashtra Police | महाराष्ट्रात 1000 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण

Continues below advertisement
देशभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाबाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात तब्बल 221 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 1007 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून 113 जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram