Monsoon Tourist Spot Near Mumbai : पावसाळ्यात भन्नाट ट्रीपसाठी ही ठिकाणं तुम्हाला माहीत आहेत का?

Continues below advertisement

Monsoon Tourist Spot Near Mumbai : पावसाळ्यात भन्नाट ट्रीपसाठी ही ठिकाणं तुम्हाला माहीत आहेत का?  शहरी धकाधुकीच्या जीवनातून बाहेर पडल्यावर ज्यावेळी आपली पावल निसर्गाच्या दिशेने चालतात  त्या वेळी सारा थकवा दूर होतो.. असाच निसर्गाचा कुशीत वसलेला धबधबा म्हणजे भिवपुरी धबधबा      हा धबधबा मुंबई-पुणे पासून जवळ कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे आहे. भिवपुरी हे छोटेसे गाव असल तरीही  येथे एक रेल्वे स्टेशनही आहे . भिवपुरी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनवर  उतरून धबधब्याकडे  जाता येते. २० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा अनेकांचे आकर्षण ठरतो...   माळशेज घाट   माळशेज घाट हे अनेक  पर्यटकांचे आकर्षण आहे..  पुण्यापासून 126 किमी अंतरावर असलेल्या माळशेज घाट येथे अनेक धबधब्यांचा  पर्यटकांना आनंद घेता येतो. यासह येथील निसर्ग रम्य परिसर पाहण्याजोगा असतो ..  पाचगणी   महाराष्ट्रातील पाचगणी हे हिलस्टेशन  सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे..      सुंदर आणि मनमोहक फुलांनी बहरलेला कास पठारावरील या ठिकाणाची युनेस्कोनी देखील दखल घेतली आहे..   मॅप्रो गार्डन पाचगणीतील सुंदर उद्यान आहे.. यासह महाबळेश्वर,  राजापुरी लेणी , ढोल्या गणपती.. यासह अनेक ठिकाणांना पाचगणीत भेटी देत येतात ..   लोणावळ- खंडाळा   मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण सोयीचं ठिकाण. लोणावळ्यात रे वूड पार्क, वाळवण डॅम, टायगर्स पॉईंट असे अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. तसेच पावसाळ्यात पर्यटकांसाठी येथे टायगर धबधबा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.   अंबोली घाट  पावसात कोकणातले सौंदर्य पाहण्याजोगे असते..   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली घाट हे पर्यटकांसाठी फिरण्याच हक्काचं ठिकाण ..   येथील  थंड, शांत आणि प्रसन्न वातावरण मनाला सुखावणारे असते... पावसाळयात आंबोली धबधबयाचे नयनरम्य दृश्य अनेकांना मोहून टाकणारे असते..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram