Monsoon : मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. काल श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून आज केरळमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी पुढच्या 24 तासांत अनुकूल वातावरण निर्माण झालंय. एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलीय. विशेषतः विदर्भात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola