Monsoon Session : उद्यापासून पावसाळी अधिवेशन, सरकारला धारेवर धरताना विरोधकांची दमछाक होणार?
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठेवण्यात आलेल्या चाहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक गोंधळलेले असल्याची टीका शिंदेंनी केलीय..