Monsoon Return Rain : जळगाव, डहाणूमध्ये परतीचा पाऊस, अन्य भागातही मुसळधार पाऊस
यंदा पाऊस चांगला झाला. पण अनेक भागांमध्ये अतिवृष्टीत झाली आणि परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. हाता तोंडाशी आलेले पिक डोळ्यासमोर हिरावून घेतले गेले आहे. आता पुढील चार ते पाच दिवसात राज्यातून पाऊस माघारी फिरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.