Maharashtra Monsoon : पुढील 3 दिवसांत काही भागांमध्ये पावसाची शक्यता, विदर्भात मात्र उष्णतेची लाट
Continues below advertisement
मोसमी वारे अद्याप तळकोकणातच आहे, मात्र त्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने तीन दिवसांत पाऊस राज्याच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात ११ जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी काल सायंकाळपर्यंत आगेकूच केलेली नव्हती, मात्र त्यांची पुढील वाटचाल सुरू होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे...तर विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement