Monsoon Updates : यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार, 1 जूनला मान्सूनचं केरळात आगमन होण्याची शक्यता
Continues below advertisement
मुंबई : देशातील बळीराजासह नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार आहे. 1 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
Continues below advertisement