Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज
पुढील २४ तासांत अरबी समुद्रात कमी पट्ट्याचा पट्टा तयार होणार आहे. त्यात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यताय. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस येण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. वातावरणातलं बाष्प जर चक्रीवादळाकडे ओढलं गेलं तर महाराष्ट्रात पाऊस धडकण्यास विलंब होण्याचीही शक्यता वर्तवलीय. मात्र त्याचसोबत, उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून महाराष्ट्रात 10 जूनला पावसाचं आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
Tags :
Kerala Arabian Sea Rainfall Meteorological Department Cyclone Formation Monsoon Maharashtra Maharashtra