Monsoon Farmer Loss : परतीच्या पावसानं महाराष्ट्राला झोडपलं, पाहा कुठे किती नुकसान झालं

Continues below advertisement

बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी बळीराजाची..   यंदा पावसाने निरोप घेताना शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. ऐन सणासुदीला हाता-तोंडाला आलेला घास पावसाने अक्षरशः हिरावून घेतलाय.. शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या या संकटाने पहिला बळी घेतलाय. बीड जिल्ह्यातील राजेगाव येथील 40 वर्षीय शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलंय.. परतीच्या पावसाने सोयाबीनचं पीक शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर खराब झालं. या धक्क्यातून हताश शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केलीय.. बळीराजाच्या  कालच्या पावसामुळं राज्यातील अठरा जिल्ह्यात तब्बल एक लाख पंधरा हजार 260 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. या प्राथमिक आकडेवारीत तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाल्यांची पिकं भुईसपाट झालीत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.  दुसरीकडे निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकरी राज्य सरकारकडे मदतीची आशा लावून बसलाय.. नुकसान भरपाईचे पंचनामे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणा शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागतोय..   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram