Monsoon Alert : मान्सून आठवडाभरात अंदमानमध्ये धडकणार, तळकोकणातही याच महिन्यात पाऊस : IMD

Continues below advertisement

Monsoon Weather Update : यंदा मान्सून वेळेआधीच येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD - Indian Meteorological Department) वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस 22 मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा पाऊस 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यानंतर 20 ते 26 मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram