Maharashtra Monsoon : मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर, 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाड्यानं सगळेच जण त्रस्त आहेत. आता पावसाची प्रतीक्षा सगळ्यांना लागलीये. दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसेच अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीनं सुरु आहे. मात्र मान्सून उद्या केरळमध्ये तर 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.. गेल्या दोन दिवसांत मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसेच अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे. त्यामुळे उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
Continues below advertisement