Monsoon 2021 : यंदा सरासरीच्या 101 टक्के पाऊस , भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज

मुंबई : भारतीय हवामान खात्याने सुधारित मान्सुनचा अंदाज व्यक्त केला असून 2021 सालच्या या हंगामात 101 टक्के पावसाची सरासरी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच प्रशांत महासागरात या दरम्यान स्थिती स्थिर राहणार असून आयओडी म्हणजे इंडियन ओशियन डायपोल निगेटिव्ह राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने एका वर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली. 

गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सुनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये 98 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या 101 टक्के असेल असं सांगण्यात येतंय. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सुनला होणार आहे. त्यामुळे मान्सुनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola