Mumbai Cruise Update : नवाब मलिक यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार : मोहित कंबोज

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकऱणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. यातील रिषभ सचदेवा भाजप युवामोर्चाचे नेते मोहित कम्बोज यांचे मेहुणे आहेत. यासोबत अमीर फर्निचरवाला, प्रतीक गाभा यांनाही सोडण्यात आलं आहे. क्रुझवरील पार्टीतून या लोकांना अटक करण्यात आलं होतं. एनसीबी कार्यालयात देखील या तिघांना आणण्यात आलं होतं. मग त्यांना सोडण्याचे आदेश कुणी दिले. आमची मागणी आहे की, NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खुलासा करावा करावा. क्रुझवरील छापेमारीचं हे प्रकरण प्लॅन करुन केलेलं असून बोगस आहे, असा आरोपही त्यांनी केला. नवाब मलिक यांच्या आरोपावर आता मोहित कंबोज यांनी पत्रकार परीषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. मलिक पर्सनल अजेंडा राबवत असल्याचे त्यांनी म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola