Mohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..

Mohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..

झिशान सिद्दीकी यांचे वक्तव्य तोडून वापरले जात आहे. माझे यात नाव नाही. झिशान सिद्दीकी यांनी, बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्यादिवशी माझे त्यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले. बाबा सिद्दीकी हे माझे चांगले मित्र होते. आम्ही गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. ते एनडीए आघाडीचा भाग होते. आम्ही दोघे नेहमी एकमेकांशी बोलायचो, यामध्ये अनेकदा निवडणुकीचा विषयही असायचा. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी मी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. दुर्दैवाने आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यासारखा मित्र गमावला. याप्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि योग्य तो न्याय होईल, असे मोहित कंबोज यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, झिशान सिद्दीकी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय विरोधक मोहित कंबोज यांच्याविरुद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे. मोहित कंबोज हे भाजपच्या वर्तुळातील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. ते संघटनेचे नेते किंवा त्यांचा राजकारणाशी थेट संबंध नसला तरी भाजपमधील बड्या नेत्यांशी त्यांची जवळीक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोहित कंबोज यांचा उल्लेख आल्याने भाजपला टीकेचा सामना करावी लागण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola