Mohan Bhagwat Speech | अराजकतेचा अंत व्हावा, मोहन भागवतांचं नागपूरात भाषण

Continues below advertisement
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू समाजाच्या विविध पैलूंवर भाष्य केले. हिंदू समाज देशाला उत्तरदायी असून, हिंदू धर्म सत्य, करुणा आणि शुचितेवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. ऋषींनी आपल्या तपस्येने हिंदू धर्म बनवला. 'हिंदू' शब्दाबद्दल काही जणांना आक्षेप आहे, अशांनी 'हिंदवी', 'भारतीय' किंवा 'आर्य' म्हणावे, असे मोहन भागवत यांनी म्हटले. मोठ्या समाजात काहीवेळा मतभेद किंवा घटना घडतात, परंतु काही घटना समुदायांना भडकवण्यासाठी योजनापूर्वक घडवल्या जातात. अशा घटनांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सज्जन शक्ती आणि युवा पिढीने सजग आणि संघटित राहून आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करावा. भारताची परंपरा विविधतेचे स्वागत आणि सन्मान करते. ही विविधता भेदाचे कारण बनू नये. प्रत्येकाच्या विशिष्टता, श्रद्धा, महापुरुष आणि पूजास्थानांचा मन, वचन, कर्म याने अवमान होऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola