ABP News

Modi Shinde Advertise : देशात नरेंद्र महाराष्ट्रात शिंदे, सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमधे जाहिरात

Continues below advertisement

कल्य़ाण-़डोंबिवलीच्या लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजप युतीत काही अंशी तणाव निर्माण झाला होता. त्यापार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी आहे. आजच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेनं जाहिरात दिली आहे. राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे असं या जाहिरातीचं ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत, असा दावा नुुकताच एका सर्वेमधून करण्यात आला. याच सर्वेमध्ये फडणवीसांना पसंती देणाऱ्यांची संख्या होती २३.२ टक्के, म्हणजेच शिंदेंपेक्षा जवळपास तीन टक्क्यांनी कमी. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच आजची जाहिरात देण्यात आली आहे का, असा सवाल आता विचारला जातोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram