Sushilkumar Shinde: 'सोलापूरसाठी दिलेली आश्वासनं मोदींनी पाळली नाहीत' ABP Majha
Continues below advertisement
२०१४ नंतर काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली का?, असा सवाल गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होतोय... प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस काही मिळवण्याऐवजी काही तरी गमवतेयच... काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीतही तशीच कामगिरी काँग्रेसची पाहायला मिळाली... पाच पैकी एकाही राज्यात कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही... उलट हाती असलेलं पंजाब राज्यही गमावलं... त्यामुळे काँग्रेस कशी उभारी घेणार? असा प्रश्न निर्माण झालाय.. अनेक ज्येष्ठ नेतेही काँग्रेसवर नाराज आहेत... असेच एक म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे... काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर सुशीलकुमार शिंदेंचं मत काय आहे... त्यांच्या अशाच एक्स्क्लुझिव्ह आणि स्फोटक मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय.
Continues below advertisement