CAA Protest | नागरिकत्व कायद्याविरोधात सोलापूरात टॉर्च लावत तरुणांचं आंदोलन | ABP Majha
देशभरात भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन उग्र होत असताना सोलापुरात मात्र वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. स्वराज्य ते गणराज्य असा नारा देत सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी मशालसाठी परवानगी नाकारल्याने चक्क मोबाईल टॉर्च लावत मार्च काढला. तर पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गुलाब देऊन आभारही मानले...कोणत्याही झेंड्या आणि बॅनर शिवाय सर्वधर्मीय तरुण रस्त्यावर पाहायला मिळाले.