MOA Election: अजित पवार अध्यक्ष, पण सत्तेचा रिमोट मोहोळांकडे! सचिव, खजिनदारपदासह ११ जागांवर शिक्कामोर्तब
Continues below advertisement
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (MOA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात अखेर सामोपचाराने तोडगा निघाला आहे. यानुसार, मुरलीधर मोहोळ अध्यक्षपदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याने अजित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार, अजित पवार अध्यक्षपदी कायम राहणार असले तरी, मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष असतील. महत्त्वाचे म्हणजे, मोहोळ यांच्या गटाला ११ जागा मिळणार असून अजित पवार गटाला १० जागा मिळतील. तसेच, संघटनेच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणारे सचिव आणि खजिनदार ही दोन्ही पदे मोहोळ गटाकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement