MNS workers assault | Badlapur मध्ये परप्रांतीय Hawkers ला चोप, मराठी भाषेचा अपमान भोवला

बदलापूरमध्ये मनसैनिकांनी एका परप्रांतीय फेरीवाल्याला चोप दिला आहे. मराठी माणूस आणि मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप या फेरीवाल्यावर करण्यात आला आहे. पालिकेकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असताना, फेरीवाल्यांकडून पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित फेरीवाल्याची माहिती मिळाल्यावर मनसैनिकांनी त्याला मारहाण केली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका मनसैनिकांनी घेतली आहे. या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात पालिकेची कारवाई सुरू असतानाच हा प्रकार घडला. मनसैनिकांनी केलेल्या या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola