Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Elections) काँग्रेस (Congress) एकला चलो रे च्या भूमिकेत, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees) पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. 'कोविड काळात पगारवाढीची घोषणा झाली, पण या सरकारने एकही पैसा दिलेला नाही, आता नाही तर कधीच नाही', असा थेट इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग वर्गे (Shrirang Varge) यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यात ठाकरे सेना आणि मनसेने (Thackeray Sena and MNS) एकत्र येत भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढला आहे. तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidyanath Cooperative Sugar Factory) विक्री झाल्याच्या आरोपांमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याशिवाय, साताऱ्यातील यशवंत बँकेत (Yeshwant Bank) १३२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola