MNS : 'अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे, Vasant More यांनी केलं Sainath Babar यांचं अभिनंदन

Continues below advertisement

पुणे : राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं. यावर वसंत मोरे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं अभिनंदन केलं आहे. "अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे" कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!"असं ट्वीट वसंत मोरे यांनी केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram