MNS and Theatre : राज्यातील सिनेमागृहं, नाट्यगृहं 100 टक्के क्षमतेने सुरु करा, मनसेची मागणी
Continues below advertisement
राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झालीय. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत ट्विट करुन ठाकरे सरकारला इशारा दिलाय. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर मॉल, पब्ज, रेस्टॉरंट्ससह सगळं पूर्ववत झालं. मात्र चित्रपटगृहं, नाट्यगृहं सुरु करण्यात सरकारला नेमकी काय अडचण आहे असा सवाल खोपकर यांनी विचारलाय. तसंच या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणीही खोपकर यांनी केलीय.
Continues below advertisement