Ratnagiri : कोकणातील रस्ते आणि खड्ड्यांवर MNS आक्रमक, अधिकाऱ्यांना कोंडण्याचा मनसेचा इशारा
Continues below advertisement
कोकणातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली. रत्नागिरीतील राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मनसेनं पाचल भागात मोर्चा काढला. रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा इशाराही मनसैनिकांनी दिलाय. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा आंबा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अणुस्कुरामार्गे रस्ते वाहतूक होत आहे. पण, अणुस्कुरा-पाचल-ओणी या रस्त्यांवर पाच ते सात फुटाचे खड्डे आहेत. या रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर हा रस्ता आहे की खडकाळ पायवाट, असा प्रश्न उपस्थित होतोय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement