Deepotsav Politics : 'नाव घेतलं असतं तर काय भोक पडलं असतं?', MTDC च्या प्रमोशनवर MNS संतापली
Continues below advertisement
मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आयोजित केलेल्या दीपोत्सवावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. “‘नाव घेतलं असतं त्यांना काय भोक पडली असती का?’,” अशा शब्दांत मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या दीपोत्सवाची जाहिरात केली, मात्र त्यात आयोजक असलेल्या मनसेच्या नावाचा उल्लेख टाळला. गेली १२-१३ वर्षे मनसे हा दीपोत्सव आयोजित करत आहे, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. याउलट, पर्यटन विभागाने यावर प्रतिक्रिया देताना संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल असे म्हटले आहे, पण त्याचवेळी ‘याच्यापेक्षा चांगले दीपोत्सव आणि महामहोत्सव पर्यटन विभागाने महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत’, असे सांगत या वादाला वेगळे वळण दिले आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून श्रेयवादाचे राजकारण तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement