MNS Deepotsav : मनसेच्या दीपोत्सवावरून श्रेयवाद, सरकारवर टीकास्त्र

Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आयोजित केलेल्या शिवाजी पार्क येथील दीपोत्सवावरून आता राजकीय वाद पेटला आहे. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी, 'आयजीच्या जीवावर बायजी उधार असा हा प्रकार आहे', अशा शब्दांत सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने या दीपोत्सवाची जाहिरात सोशल मीडियावर केली, मात्र त्यात आयोजक म्हणून मनसेच्या नावाचा उल्लेख टाळल्याने हा वाद निर्माण झाला. मनसेने म्हटले आहे की, गेली १३ वर्षे आम्ही हा पूर्णपणे अराजकीय कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि लोकांना आनंद देणे हाच आमचा उद्देश आहे. काही दिवसांपूर्वीच, उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. सरकारने आमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असून, आम्हाला याचे छोटेसे श्रेय दिले असते तर मनाचा मोठेपणा दिसला असता, अशी खंत मनसेने व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola