MNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

MNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद 

लालबागमध्ये तुळशी विवाहाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमानिमित्त मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेचे उमेदवार एकत्र पाहायला मिळाले... शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी आणि मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी शिवडीतील प्रतिस्पर्धी एकाच ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. शिवडीमध्ये शिवसेनेकडून अजय चौधरी तर मनसेकडून बाळा नांदगावकर रिंगणात शिवडी विधानसभा मतदार संघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अजय चौधरी तर मनसेकडून बाळा नांदगावकर रिंगणात आहेत. या दोन्ही नेत्यांचा मतदारांना साध घालण्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. अनेक मतदार संघात प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर टीकास्त्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पण शिवडी विधानसभा मतदार संघात बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी एकत्र मतदारांना साधं घालताना पाहायला मिळाले.   बाळा नांदगावकर काय काय म्हणाले?  आम्ही विरोधक आहोत, पण दुश्मन नाही. दोघांना ही जनसेवा करायची आहे. पण मतदारांनी ठरवायचं कोणाला निवडायचं ते..माझी निशाणी दोन नंबरवर रेल्वे इंजिन त्यासाठी मी आग्रह धरणार आहे. यांची निशाणी 1 नंबरवर त्यासाठी ते आग्रह धरणार आहेत. पण ठरवायचं तुम्हाला आहे. आम्ही एका पक्षात काम केलेली लोक आहोत. आम्ही जर एकमेकांचे विरोधक असलो तरी दुश्मन नाही आहोत. ते ही जनसेवेसाठी उभे आहेत मी ही जनसेवेसाठी उभा आहे. ठरवायचं तुम्हाला काय करायच ते त्यामुळं माझ्या त्यांना शुभेच्छा त्यांच्या मला शुभेच्छा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola