Zero Hour MNS Shiv Sena Alliance | मनं जुळायला लागली, साहेब निर्णय घेतील; MNS नेत्याचे मोठे विधान
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी युतीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका दूरध्वनी मुलाखतीत त्यांनी सांगितले की, दोन बंधूंमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्यांची मनं जुळायला लागली आहेत. निवडणुकांचा विषय सुरू असला तरी, परिस्थिती अजून स्पष्ट नाही. संजय राऊत यांच्या 'बात बहुत दूर तक जा चुकी है' या विधानाचा संदर्भ देत, नांदगावकर म्हणाले की, जोपर्यंत कोणताही विषय एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे उचित नाही. आमच्या पक्षाच्या वतीने मी नेहमी बोलत असतो, परंतु अंतिम निर्णय साहेब घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल. युतीबाबत मी पहिल्यापासून सकारात्मक आहे. पक्षप्रमुखांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दोन्ही पक्षांकडून युतीसाठी सकारात्मकता आहे. मात्र, ही दोन पक्षांची युती असेल आणि महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.