Bala Nandgaonkar On Morcha :.कारवाई होईल त्याला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत', बाळा नांदगावकरांचा पोलिसांना इशारा
Continues below advertisement
मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) पुकारलेल्या मोर्चावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली आहे, जरी पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. 'परवानगी मिळालेली नाहीये त्यामुळं जी काही कारवाई होईल त्याला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत,' असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. मतदार याद्या सदोष आणि अस्वच्छ असल्याचा आरोप करत, त्या आधी स्वच्छ करा आणि मगच निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी पक्षानेही या मोर्चात सहभागी व्हावे, कारण स्वच्छ मतदार याद्या सर्वांच्याच हिताच्या आहेत, असे आवाहनही त्यांनी केले. पाऊस आला तरी लोक मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement