MNS Protest | RTO कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा, वाहतूक कोंडीसह अनेक प्रश्न
Continues below advertisement
मनसे वाहतूक सेनेच्या वतीने मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विरार पूर्व येथील चंदरसार पेट्रोलपंपापासून आरटीओ कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील वाढती वाहतूककोंडी, अनधिकृत रिक्षा आणि अवजड वाहनांची नियोजनाअभावी महामार्गावर होणारी वाहतूककोंडी यासह इतरही प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. टँकर अपघातात मृत्यू झालेल्या संजना राणे यांची अकरा वर्षांची कन्या सलोनी राणेही या मोर्चात सहभागी झाली होती. वाहतूक समस्या आणि अपघातातील बळींना न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. आरटीओ कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement