तब्बल दीड वर्षांनी राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर मास्क! पुणे दौऱ्यात घेतली बाबासाहेब पुरंदरेंची भेट
कोरोनाची भारतात होऊन जवळपास दीड वर्षे झालं, तरी राज ठाकरेंनी इतक्या काळात मास्क घातला नाही. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट घेतली आणि यावेळी राज ठाकरेंनी चक्क मास्क घातल्याचं दिसून आलं.