Thackeray Alliance: युतीआधीच मनसेची १२५ उमेदवारांची यादी तयार, ठाकरेंच्या शिवसेनेला देणार धक्का?
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे यांच्यात युतीच्या हालचालींना वेग आला आहे. जागावाटपाची औपचारिक चर्चा सुरू होण्यापूर्वीच मनसेने २२७ पैकी तब्बल १२५ जागांची यादी तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, 'जिथे तिढा असेल तिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतः तो सोडवतील,' असेही ठरल्याचे कळते. मनसेने माहीम, दादर, भांडुप, घाटकोपर, जोगेश्वरी, परळ आणि भायखळा यांसारख्या मराठीबहुल भागांवर लक्ष केंद्रित केले आहे, जिथे पक्षाची चांगली पकड आहे. ११ नोव्हेंबर रोजी पालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या बैठकांमध्ये प्रत्येक जागेवर ताकद आणि निवडून येण्याच्या क्षमतेनुसार (मेरिट) उमेदवाराला संधी दिली जाईल, असे ठरले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement