MNS | 'राज'कारण आता मराठीवरून हिंदुत्वाकडे? मनसेच्या तिरंगी झेंड्यात आता फक्त भगवा? | ABP Majha
Continues below advertisement
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे. मनसेच्या झेंड्यात मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचे इंजिन) नसेल.
Continues below advertisement