Mumbai Morcha : मुंबईत विनापरवानगी 'सत्याचा मोर्चा' काढणं भोवलं, मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल
Continues below advertisement
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) काढलेल्या 'सत्याच्या मोर्चा'नंतर (Satyacha Morcha) आता राजकारण तापले आहे. विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे, मात्र दुसरीकडे भाजपच्या (BJP) 'मूक आंदोलना'वर (Mook Andolan) कोणतीही कारवाई न झाल्याने विरोधकांनी पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. 'आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणं आणि त्यांचे लोक रस्त्यावर बसतात, त्याच्यावर गुन्हा दाखल न होणं, हा पक्षपातीपणा आहे,' असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला आहे. आमच्यावर अशा अनेक केसेस आहेत, आम्ही त्यांना भीक घालत नाही, असेही देशपांडे म्हणाले. याउलट, भाजपने हे आंदोलन विरोधकांच्या खोट्या कथानकाच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. मविआ आणि मनसेच्या नेत्यांनी मतदार यादीतील गोंधळाविरोधात हा मोर्चा काढला होता, ज्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या कारवाईनंतर, भाजप प्रवक्ते नवनाथ बान यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement