Mahesh Jadhav : Raj Thackeray यांच्यावर गंभीर आरोप करणारे महेश जाधव अजितदादांच्या राष्ट्रवादीत
नवी मुंबईत मनसेला मोठा धक्का बसलाय.. गेली १७ वर्ष मनसेच्या उपाध्यक्ष पदी काम केलेल्या, आणि मनसेचे कामगार सेेनेचे अध्यक्ष असणाऱ्या महेश जाधवांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.. अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा महेश जाधव यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता. त्यानंतर अमित ठाकरे आणि महेश जाधव यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मधल्या काळातील अंतर्गत संघर्षानंतर महेश जाधवांनी आपला मार्ग बदलत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.