Mahi Khan Apology:'मी कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही', मनसेच्या दणक्यानंतर माही खानने मागितली माफी

Continues below advertisement
एअर इंडियाच्या (Air India) विमानात मराठी भाषेवरून झालेल्या वादानंतर आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर माही खानने (Mahi Khan) माफी मागितली आहे. मनसे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी इशारा दिल्यानंतर खानने एक व्हिडीओ शेअर करत तमाम महाराष्ट्रीयन लोकांची माफी मागितली. 'मी कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही... तुम्हाला काहीही वाईट वाटले असेल तर मी मनापासून माफी मागतो,' असे माही खानने म्हटले आहे. माही खानने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आणि प्रसिद्धीसाठी व्हिडीओ बनवल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण तापले होते. या प्रकरणामुळे महिलेला नोकरी गमवावी लागली होती, ज्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी माही खानला चोप देण्याचा इशारा दिला होता. या वादानंतर माही खानने आपली मूळ पोस्ट डिलीट केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola