Maha Vikas Aghadi: 'आम्ही हात पसरले का?', Raj Thackeray यांच्या MNS चा काँग्रेसला थेट सवाल

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस (Congress) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) संभाव्य आघाडीवरून चर्चांना उधाण आले आहे. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. 'आमच्या पक्षाकडून आमच्या नेत्यांकडून आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का?' असा थेट सवाल अविनाश अभ्यंकर यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये मनसेला महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) घेण्यावरून वेगवेगळी मते आहेत. काही नेत्यांचा याला विरोध आहे, तर काही नेते निर्णयासाठी दिल्लीकडे बोट दाखवत आहेत. दुसरीकडे, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर सावध भूमिका घेत भाष्य करणे टाळले आहे. मनसेच्या समावेशावरून महाविकास आघाडीमध्येच मतभेद असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola