Gyanvapi Mosque प्रमाणे पुण्यात मंदिराच्या जागी दर्गा, मनसे नेते Ajay Shinde यांचा दावा
Continues below advertisement
MNS Claims Puneshwar Narayaneshwar Mandir : देशात सध्या ज्ञानवापीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच पेटला आहे. आजपासून जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची (District Court) सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. ज्ञानवापीचा मुद्दा तापत असताना आता पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांच्या (Puneshwar Narayaneshwar Mandir) जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदिरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv