MNS Gudi Padwa Melawa Shivaji Park: मनसेचा गुढीपाडवा मेळावा, सेना भवन ते शिवतीर्थ मनसैनिकांची गर्दी
Continues below advertisement
MNS Gudi Padwa Melawa Shivaji Park: सेना भवन ते शिवतीर्थ मनसैनिकांची गर्दी,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बहुचर्चित गुढीपाडवा मेळावा आज शिवतीर्थावर संपन्न होत आहे. या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मध्यंतरी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे भाजपसोबत जाणार का,याची प्रचंड उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांच्याकडून याबद्दल भाष्य करण्यात येणार आहे. मात्र, आजच्या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याचा पत्ता कोणालाही नाही.
Continues below advertisement