Shivaji Park Gudi Padwa : शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा मुंबईत पार पडत आहे या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक येणार आहेत आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे काय बोलतात हे मनसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण राज ठाकरे यांच्या पक्षाने 2014 2019 या दोन महत्त्वाच्या लोकसभेच्या निवडणुका लढल्या नव्हत्या. त्यामुळे 2024 च्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे काय निर्णय घेतायत हे पाहणं महत्त्वाचे राहणार आहे. मागील काही दिवसात राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे महायुतीत सहभागी मनसे होणार की मनसे वेगळी भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शिवाजी पार्क परिसरातून सभेचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी