Voter List Fraud: नवी मुंबईत धक्कादायक प्रकार, चक्क सार्वजनिक शौचालयाच्या पत्त्यावर मतदाराची नोंदणी.

Continues below advertisement
नवी मुंबईत (Navi Mumbai) मतदार यादीतील घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. 'निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शौचालयात मतदाराची नोंदणी करून हद्द केली आहे', असा थेट आरोप मनसेने केला आहे. नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर २३ मधील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या पत्त्यावर मतदाराची नोंदणी झाल्याचे मनसेने पुराव्यानिशी समोर आणले. या गंभीर प्रकारानंतर मनसेने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून मतदार यादीतून तब्बल १५,००० बोगस आणि १८,००० दुबार नावे तात्काळ वगळण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola