MNS Deepotsav: '...सरकार जाईल वाटलं नव्हतं', दीपोत्सवाच्या श्रेयावरून MNS आक्रमक
Continues below advertisement
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाला (Deepotsav) मोठी गर्दी होत आहे. 'मनसेच्या वतीनं यंदा सलग तेराव्या वर्षी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय'. या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सायंकाळच्या वेळी होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघत असून, हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तरुण-तरुणींची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पर्यटन विभागाने (Maharashtra Tourism) या कार्यक्रमाची जाहिरात करताना आयोजक मनसेचा उल्लेख टाळल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते,' अशा शब्दांत मनसेने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement