Raj Thackeray Full Speech : अंदानी, अदानींवर घणाघात, मतदार यादीतील घोळ,राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) झालेल्या गंभीर घोळावर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'जवळपास ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्रात या यादीत भरलेले आहेत... हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या देशातल्या मतदारांचा अपमान आहे,' असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी निवडणुकीत बाहेरून २० हजार मतदार आणल्याची कबुली दिल्याचा संदर्भही त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा जुना व्हिडीओ दाखवत, ते विरोधी पक्षात असताना त्यांनीही निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नयेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. मुंबई विमानतळाची जागा अदानी समूहाला देण्याचा आणि महाराष्ट्रातील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा मोठा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement