ABP News

MNS-BJP Alliance : मुंबईतील दोन जागा मनसेला देण्याचा राज ठाकरेंचा अमित शाहांसमोर प्रस्ताव

Continues below advertisement

MNS-BJP Alliance : मुंबईतील दोन जागा मनसेला देण्याचा राज ठाकरेंचा अमित शाहांसमोर प्रस्ताव
राज ठाकरे आणि अमित शाहांच्या बैठकीत नेमकं काय घडलं याची EXCLUSIVE माहिती एबीपी माझाकडे आली आहे. राज ठाकरेंनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवाल. त्यावर एक जागा निश्चित पण दुसऱी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी सांगितलं. तसच राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही असं अमित शाह म्हणाले. 
विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप तेव्हा ठरवू असं शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे याआधी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जे झालं त्याची पुनराव्रत्ति व्हायला नको, आणि म्हणूनच आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू अशी स्पष्ट भूमिका शाहांनी मांडली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram