Thane MNS : ठाण्यात उद्या मनसेचा आक्रोश मोर्चा, शिवसेनेनं आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप
ठाण्यामध्ये मनसे उद्या सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात मनसे आक्रोश मोर्चा काढणार आहे. दुपारी बारा वाजल्यापासून या मोर्चाला तलावपाळी इथून सुरुवात होईल. हा मोर्चा थेट महापालिका मुख्यालयात पर्यंत काढण्यात येणार आहे. शिवसेनेने निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्याचविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मनसे नेते अभिजीत पानसे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि आमदार राजू पाटील करणार आहे.