Raj Thackeray meets Child : लहानग्याला दुर्मिळ आजार, मनसैनिकाच्या मुलासाठी राज ठाकरेंचं सरप्राईज
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पिंपरीत एका लहान मुलाची भेट घेतली. या लहानग्याला मस्क्युलर डीस्ट्रोपी नावाचा दुर्मिळ आजार झालाय. त्यामुळे त्याचं शाळाेत जाणंही बंद आहे. पण राज ठाकरेंवर त्याचं प्रचंड प्रेम. मनसैनिक असलेल्या आपल्या वडिलांना ही इच्छा बोलून दाखवली... आणि आज पिंपरी चिंचवड मधल्या दापोडी इथ असलेल्या राज विशाल देशपांडे या छोट्या मनसैनिकाला भेटण्यासाठी खुद्द राज ठाकरे आले. राज यांनी त्याला चॉकलेट आणि गेम्स भेट दिले तर लहानग्या राज देशपांडेनं राज ठाकरेंना पेन भेट दिला.
Continues below advertisement