Voter List Scam: 'मतदार यादीत मेलेल्यांची नावं, लाखापेक्षा जास्त बोगस मतदार', आमदार Sanjay Gaikwad यांचा घरचा आहेर

Continues below advertisement
बुलढाणा (Buldhana) मतदार यादीतील घोळावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी गंभीर आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'जिल्ह्यात मतदार यादीत लाखापेक्षा अधिक बोगस नावं आहेत', असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांच्याशी संपर्क साधल्याचेही सांगितले. गायकवाड यांच्या मते, यादीमध्ये अनेक वर्षांपूर्वी मरण पावलेल्या, तसेच तीस वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेल्या लोकांची आणि अधिकाऱ्यांची नावे अजूनही कायम आहेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दुबार नोंदणी असलेली चार हजार नावे लेखी स्वरूपात कळवली आहेत, तरीही कारवाई झालेली नाही, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोग ही दुबार आणि बोगस नावे का काढत नाही, असा सवाल करत, नवीन पात्र तरुणांना मतदानाचा हक्क नाकारला जात असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola