अनिल परब यांच्या सांगण्यावरुन चुकीचे आरोप; नोटीस आल्यावर खरी माहिती कोर्टात मांडू : MLA Ravi Rana
आमदार रवी राणा यांनी निवडणूकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे येत्या सहा महिन्यात रवी राणा यांच्यावर कारवाई करणार असल्याचे निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेल्या शपथ पत्रात सांगितलं.
आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे आढळून आले आहे. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी 25 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला आहे. परंतु या प्रकरणात अनेक महिन्यापर्यंत काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे अमरावती शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी याचिका दाखल करण्यात आली होती.